अध्याय: 17, ओवी: 148

हें असो उणें आगीतें | म्हणे तैसें राइतें | [ आहारा राजसस्येष्टाः ] पढियें प्राणापरतें | राजसासि गा ||१४७||ऐसा न पुरोनि तोंडा | जिभा केला वेडा | अन्नमिषें अग्नि भडभडां | पोटीं भरी ||१४८|| [ दुःखशोकामयप्रदाः ] तैसाचि लवंघा सुटे | मग भुईं ना सेजे सांटे | पाणियाचें न सुटे | तोंडोनि पात्र ||१४९||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.