अध्याय: 17, ओवी: 279
[ अनुपकारिणे ] आणि दान जया द्यावें | तयातें ऐसेया पाहावें | जया घेतलें नुमचवे | कायसेनिही ||२७८||साद घातलिया आकाशा | नेदी प्रतिशब्द जैसा | कां पाहिला आरसा | येरीकडे ||२७९||ना तरी उदकाचिये भूमिके | आफळिलेनि कंदुकें | उधळौनि कवतिकें | न येइजे हाता ||२८०||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
