अध्याय: 17, ओवी: 8
पाठीं निवृत्तिकर्णताळें | आहालली ते पूजा विधूळे | तेव्हां मिरविसी मोकळें | आंगाचें लेणें ||७|| वामांगीचा लास्यविलास | जो हा जगद्रूप आभास | तो तांडवमिसें कळास | दाविसी तूं ||८|| हें असो विस्मयदातारा | तूं होसी जयाचा सोयरा | सोइरिकेचिया व्यवहारा | मुकेचि तो ||९||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
