अध्याय: 17, ओवी: 88
तयांचीं आचरतीं पाउलें | पाऊनि सात्त्विकी श्रद्धा चाले | तो तेंचि फळ ठेविलें | ऐसें लाहे ||८७||पैं एक दीप लावी सायासें | आणिक तेथें लाऊं बैसे | तरि तो काय प्रकाशें | वंचिजे गा ||८८||कां येकें मोल अपार | वेंचोनि केलें धवळार | तो सुरवाड वस्तीकर | न भोगी काई ||८९||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.

