अध्याय: 18, ओवी: 1011

[ तथा ] तो जेणें क्रमें ब्रह्म | [ समासेनैव ] होणें करी गा सुगम | [ निबोध मे ] तया क्रमाचें आतां वर्म | आईक सांगों ||१०१०||[ बुद्ध्या विशुद्धया ] तरी गुरू दाविलिया वाटा | येऊनि विवेकतीर्थतटा | धुऊनियां मळवटा | बुद्धीचा तेणें ||१०११||[ युक्तः ] मग राहूनें उगळिली | प्रभा चंद्रें आलिंगिली | तैसी शुद्धत्वें जडली | आपणयां बुद्धि ||१०१२||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.