अध्याय: 18, ओवी: 1116
जो जेथ जैसें पाहों बसे | तया तेथ तैसेंचि असे | हें उजियेडें कां दिसे | अखंडें जेणें ||१११५||स्वप्नाचें दिसणें न दिसणें | जैसें आपलेनि असलेपणें | विश्वाचें आहे नाहीं जेणें | प्रकाशें तैसें ||१११६||ऐसा हा सहज माझा | प्रकाश जो कपिध्वजा | तो भक्ति या वोजा | बोलिजे गा ||१११७||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
