अध्याय: 18, ओवी: 1201
ऐसें आत्मत्वे मज एकातें | इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें | आणि याही बोधा जाणतें | तेंही मीचि जाणें ||१२००||पैं चेइलेयानंतरें | आपुलें एकपण उरे | तेंही तयावरी स्फुरे | तयासींचि जैसें ||१२०१|| कां प्रकाशतां अर्क | तोचि होय प्रकाशक | तयाही अभेदा द्योतक | तोचि जैसा ||१२०२||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
