अध्याय: 18, ओवी: 1297
महावीर अकरा अक्षौहिणी | तुवां येकें नागविले रणांगणीं | तो स्वभाव कोदंडपाणी | जुंझवील तूतें ||१२९६||हां गा रोग कायी रोगिया | आवडे दरिद्र दरिद्रिया | परि भोगविजे बळिया | अदृष्टें जेणें ||१२९७|| तें अदृष्ट अनारिसें | न करील ईश्वरवशें | तो ईश्वरही असे | हृदयीं तुझ्या ||१२९८||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.




