अध्याय: 18, ओवी: 1314
तया सिंधू भरितें दाटे | सोमकांता पाझर फुटे | कुमुदांचकोरांचा फिटे | संकोच तो ||१३१३||तैसीं बीजप्रकृतिवशें | अनेकें भूतें येकें ईशें | चेष्टवीजती तो असे | [ हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ] तुझ्या हृदयीं ||१३१४||[ अयं भावः ] अर्जुनपण न घेतां | मी ऐसें जें पंडुसुता | उठतसे तें तत्वता | तयाचें रूप ||१३१५||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
