अध्याय: 18, ओवी: 1318
म्हणौनि ईश्वर गोसावी | तेणें प्रकृति हे नेमावी | तिया सुखें राबवावीं | इंद्रियें आपुलीं ||१३१७||तूं करणें नकरणें दोन्ही | लाऊनि प्रकृतीच्या मानीं | प्रकृतीही कां अधीनी | हृदयस्था जया ||१३१८|| [ तमेव शरणं गच्छेति ] तया अहं वाचा चित्त आंग | देऊनियां शरण रिग | महोदधी कां गांग | रिगालें जैसें ||१३१९||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
