अध्याय: 18, ओवी: 1486

म्हणौनि शास्त्रीं जो इये | उचित संप्रदाय आहे | तो ऐक आतां बहुवें | आदरेंसीं ||१४८५|| [ इदं ते ] तरि तुवां हें जें पार्था | गीताशास्त्र लाधलें आस्था | [ नातपस्काय ] तें तपोहीना सर्वथा | [ न ] सांगावें ना हो ||. १४८६||[ नाभक्ताय ] अथवा तापसही जाला | परि गुरूभक्तीं जो ढिला | तो वेदीं अंत्यज वाळिला | तैसा वाळीं ||१४८७||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.