अध्याय: 18, ओवी: 1610

[ व्यासप्रसादाच्छ्रुतवान् ] तेव्हां बैसतेनि आनंदें | म्हणे जी जें उपनिषदें | नेणती तें व्यासप्रसादें | ऐकिलें मियां ||१६०९||[ एतद्गुह्यमहं ] ऐकतांचि ते गोठी | ब्रह्मत्वाची पडिली मिठी | मीतूंपणेंसीं दिठी | विरोनि गेली ||१६१०||[ योगं योगेश्वरात्कृष्णात् ] हे आघवेचि कां योग | जया ठाया येते मार्ग | तयाचें वाक्य सवंग | केलें मज व्यासें ||१६११||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.