अध्याय: 18, ओवी: 1642

[ विजयः ] कृष्ण विजयस्वरूप निजांगें | तो राहिला असे जेणें भागें | तैं जय लागवेगें | तेथेंचि आहे ||१६४१||[ यत्र पार्थो धनुर्धरः ] विजयी नामें अर्जुन विख्यात | विजयस्वरूप श्रीकृष्णनाथ | श्रियेसीं विजय निश्चित | तेथेंचि असे ||१६४२||तयाचिये देशींच्या झाडीं | कल्पतरूतें होडी | न जिणावें कां येवढीं | मायबापें असतां ||१६४३||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.