अध्याय: 18, ओवी: 1668
कीं गीता हे सप्तशती | मंत्रप्रतिपाद्य भगवती | मोहमहिषा मुक्ती | आनंदली असे ||१६६७|| म्हणौनि मनें कायें वाचा | जो सेवक होईल इयेचा | तो स्वानंदसाम्राज्याचा | चक्रवर्ती करी ||१६६८|| कीं अविद्यातिमिररोखें | श्लोक सूर्यातें पैजा जिंके | ऐसे प्रकाशिले गीतामिषें | रायें श्रीकृष्णें ||१६६९||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.


