अध्याय: 18, ओवी: 1709

म्हणोनि श्रीव्यासाचा हा थोर | विश्वासि जाला उपकार | जे श्रीकृष्णउक्ती आकार | ग्रंथाचा केला ||१७०८|| [ ग्रन्थकर्तृत्वाभिमानपरिहारः ]आणि तोचि हा मी आतां | श्रीव्यासाचीं पदें पाहतां | आणिला श्रवणपथा | मर्‍हाठिया ||१७०९||व्यासादिकांचे उन्मेख | राहाटती जेथ साशंक | तेथ मीही रंक येक | वाचाळी करीं ||१७१०||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.