अध्याय: 18, ओवी: 1723
आणि बाप पुढां जाये | ते घेत पाउलाची सोये | बाळ ये तरि न लाहे | पावों कायी ||१७२२|| तैसा व्यासाचा मागोवा घेत | भाष्यकारांतें वाट पुसत | अयोग्यही मी न पवत | कें जाईन ||१७२३|| आणि पृथ्वी जयाचिया क्षमा | नुबगे स्थावरजंगमा | जयाचेनि अमृतें चंद्रमा | निववी जग ||१७२४||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.

