अध्याय: 18, ओवी: 186

जे कर्माची ऐलीकड | नावेक दिसे दुवाड | जे वाहतिये वेळ जड | शिदोरी जैसी ||१८५|| जैसा निंब जिभे कडवट | हिरडा पहिलें तुरट | तैसा कर्मा ऐल सेवट | खणुवाळा होय ||१८६|| कां धेनू दुवाड शिंग | शेवंतीये अडव आंग | भोजनसुख महाग | पाक करितां ||१८७||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.