अध्याय: 18, ओवी: 20
ना येर्हवीं तरी आठवी | राहोनि स्तुति जैं करावी | तैं गुणागुणी धरावी | सरोभरी कीं ||१९|| तरी तूं जी एकरसाचें लिंग | केवीं करूं गुणागुणीं विभाग | मोतीं फोडोनि सांधितां चांग | कीं तैसेंचि भलें ||२०|| आणि बाप तूं माय | इंहीं बोलीं ना स्तुती होये | डिंभोपाधिक आहे | विटाळ तेथें ||२१||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
