अध्याय: 18, ओवी: 246
[ मिश्रं च ] आणि गोड आंबट मिळे | तेथ रसांतर फरसाळें | उठी दोहीं वेगळें | दोहीं जिणतें ||२४५||रेचकचि योगवशें | होय स्तंभावयादोषें | सत्यासत्य-समरसें | सत्यासत्यचि जिणिजे ||२४६|| म्हणोनि समभागें शुभाशुभें | मिळोनि अनुष्ठानाचें उभें | तेणें मनुष्यत्व लाभे | तें मिश्र फळ ||२४७||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.





