अध्याय: 18, ओवी: 318
इंद्रियांच्या दाहें हातीं | जाचोनि दिवोराती | सुखदुःखें प्रकृती | जोडीजती जियें ||३१७||तियें भोगावया पुरुखा | आन ठावोचि नाहीं देखा | म्हणौनि अधिष्ठानभाखा | बोलिजे देह ||३१८|| हें चोविसांही तत्त्वांचें | कुटुंबघरवस्तीचें | तुटे बंधमोक्षांचें | गुंथाडें एथ ||३१९||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.

