अध्याय: 18, ओवी: 332

तें पृथग्विध करण | कर्माचें इया कारण | तिसरें गा जाण | नृपनंदना ||३३१|| [ विविधा च पृथक्चेष्टा ] आणि पूर्वपश्चिमवाहणी | निघालिया वोघाचिया मिळणी | होय नदी नद पाणी | एकचि जेवीं ||३३२||तैसी क्रियाशक्ति पवनीं | असे जे अनपायिनी | ते पडिली नाना स्थानीं | नाना होय ||३३३||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.