अध्याय: 18, ओवी: 371
तैसें हेतुकारणमेळें | उठी कर्म जें आंधळें | तें शास्त्राचे लाहे डोळे | तैं न्याय्य म्हणिपे ||३७०||[ विपरीतं वा ] दूध वाढतां ठावो न पवे | तंव उतोनि जाय स्वभावें | तोही वेंच परि नव्हे | वेंचिलें तें ||३७१||तैसें शास्त्रसाह्येंवीण | केलें नोहे जरी अकारण | तरि लागो कां नागवण | दानलेखीं ||३७२||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
