अध्याय: 18, ओवी: 774
तरि सुख तें गा किरीटी | दाविजेल तुज दिठी | जें आत्मयाचिये भेटी | जीवासि होय ||७७३||[ अभ्यासाद्रमते यत्र ] परि मात्रेचेनि मापें | दिव्यौषध जैसें घेपे | कां कथिलाचें कीजे रुपें | रसभावनीं ||७७४||ना ना लवणाचें जळ | होआवया दोनी चार वेळ | देऊनि सांडिजती ढाळ | तोयाचे जेवीं ||७७५||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
