अध्याय: 18, ओवी: 793
तेव्हां सागरीं गंगा जैसी | आत्मीं मीनल्या बुद्धि तैसी | अद्वयानंदाची आपैसी | खाणी उघडे ||७९२|| ऐसें स्वानुभवविश्रामें | वैराग्यमूळ जें परिणमे | [ तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तं ] तें सात्त्विक येणें नामें | बोलिजे सुख ||७९३||[ विषयतेति ] आणि विषयेंद्रिया | मेळ होतां धनंजया | जें सुख जाय थडिया | सांडूनि दोन्ही ||७९४||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
