अध्याय: 18, ओवी: 849
हें विज्ञान बरवें | तें गुणरत्न जेथ आठवें | [ आस्तिक्यं ] आणि आस्तिक्य जाणावें | नववा गुण ||८४८||पैं राजमुद्रा आथिलियां | प्रजा भजे भलतयां | तेविं शास्त्रें स्वीकारिलिया | मार्गमात्रातें ||८४९||आदरें जें कां मानणें | तें आस्तिक्य मी म्हणें | तो नववा गुण जेणें | कर्म तें साच ||८५०||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.


